Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Abhishek Sharma Penalized for IPL Code of Conduct Breach After KKR Clash : कोलकाता सामन्यानंतर अभिषेक शर्मावर कारवाई; आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याने दंड आणि डिमेरिट पॉइंट
abhishake sharma

abhishake sharma

esakal

Updated on

आयपीएल २०२६ च्या हंगामातील पहिल्या सामन्यात अपयशानंतर सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दमदार फलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. डावखुरा फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या अभिषेकने केवळ २१ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४८ धावा कुटल्या.

मात्र, त्याचे अर्धशतक नशिबाने हुकले आणि एका वादग्रस्त झेलमुळे त्याची ही खेळी संपली. ब्लेसिंग मुझारबानीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. डीप मिड-विकेटमध्ये उभ्या असलेल्या वरुण चक्रवर्तीने त्याचा झेल टिपला. झेल पूर्णपणे स्पष्ट नसतानाही तिसऱ्या पंचांनी विविध कोनांतून पुनरावलोकन करून अभिषेकला बाद ठरवले. सामना संपल्यानंतर मात्र या खेळाडूला नवीन संकटाचा सामना करावा लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com