
IPL : प्रसिद्ध फुटबॉलपटू झाला राजस्थान रॉयल्सचा नवा 'गुंतवणूकदार'
आयपीएलमधील (IPL 2022) राजस्थान रॉयल्समध्ये (Rajasthan Royals) काही विदेशी खेळाडूंनी (American Athlete) गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सला नवे मालक मिळाले आहेत. अमेरिकेचा प्रसिद्ध फुटबॉलपटू (American Football Player) लॅरी फिट्झगेराल्ड (Larry Fitzgerald), दोन वेळा ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणार बास्केटबॉल खेळाडू ख्रिस पॉल (Chris Paul) आणि एनएफएल स्टार केल्विन बीचम (Kelvin Beachum) यांनी राजस्थान रॉयल संघात गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा: कुलदीप यादवला प्रेमाची गरज; दिल्लीच्या हेड कोचचे मत
राजस्थान रॉयल्सची मालकी ही इमर्जिंग मीडिया व्हेंचरकडे आहे. त्याचे संपूर्ण नियंत्रण मनोज बडाले यांच्याकडे आहे. याचबरोबर आता तीन विदेशी खेळाडूंनी देखील राजस्थान रॉयल्समध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, 'राजस्थानमध्ये अमेरिकेच्या काही अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी गुंतवणूक केली आहे. यात लॅरी फिट्झगेराल्ड, ख्रिस पॉल आणि केल्विन बीचम यांचा समावेश आहे. या तिघांनी राजस्थान बेस फ्रेंचायजीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी इमर्जिंग मीडिया व्हेंचरमार्फत राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी पूर्णपणे मनोज बडाले यांच्या मालकीची आहे. आता फ्रेंजायजीशी पॉल, फिट्झगेराल्ड आणि बीचम हे छोटे गुंतवणूकदार जोडले जाणार आहेत.'
हेही वाचा: संजय बांगरने दिनेश कार्तिकला फलंदाजी करण्यापासून का रोखलं?
पॉल हे एनबीए प्लेअर्स असोसिएशनचा माजी अध्यक्ष होता. तो या गुंतवणुकीबद्दल म्हणाला की, 'मी आयपीएलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक आहे ही गोष्ट खूप उत्साह वाढवणारी आहे.' नव्या गुंतवणुकीमुळे आता बार्बाडोस ट्रायडंट, सीएमजी कंपनीज राजस्थान रॉयल्सच्या अधिपत्याखाली आले आहेत. याबाबत मनोज बडाले म्हणाले की, 'ख्रिस, लॅरी आणि केल्विन यांना गुंतवणूकदार म्हणून आमच्याशी जोडलेले पाहून खूप आनंद झाला. त्यामुळे आता रॉयल्स हा एक जागतिक स्तरावरील ब्रँड झाला आहे.'
Web Title: American Athlete Join Ipl Franchise Rajasthan Royals As A Investor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..