Ashutosh Sharma: स्वप्न पाहिलं अन् पूर्णही झालं... बुमराहला मारलेल्या 'त्या' षटकाराबाबत काय म्हणाला आशुतोष?

PBKS vs MI, IPL 2024: बुमराहला स्वीप शॉट मारत षटकार ठोकणारा आशुतोष शर्मा मुंबई-पंजाब सामन्यानंतर काय म्हणाला? जाणून घ्या.
Jasprit Bumrah | Ashutosh Sharma | IPL 2024
Jasprit Bumrah | Ashutosh Sharma | IPL 2024Sakal

Ashutosh Sharma Six to Jasprit Bumrah: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. गुरुवारी (18 एप्रिल) झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 9 धावांनी विजय मिळवला.

परंतु, या सामन्यात पंजाब किंग्सकडून आशुतोष शर्माने कडवी झुंज दिली, त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. त्यातही त्याने जसप्रीत बुमराहला मारलेल्या एका षटकाराने सर्वांचेच लक्ष वेधले.

पंजाबच्या डावात 13 व्या षटकातील पाचवा चेंडू बुमराहने नो बॉल टाकला होता. त्यामुळे त्याला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला, तसेच नो-बॉलमुळे पंजाबला फ्रि-हिटही मिळाली. याचाच फलंदाजी करणाऱ्या आशुतोषने फायदा उचलला.

बुमराहने हा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आशुतोषने खाली झुकत त्याला स्वीप शॉट खेळत षटकार ठोकला.

Jasprit Bumrah | Ashutosh Sharma | IPL 2024
IPL 2024, Points-Table: पंजाबविरुद्ध विजयाने मुंबईला फायदा, पाँइंट्स-टेबलमध्ये घेतली उडी; जाणून घ्या संघांच्या क्रमवारी

आशुतोषचा हा शॉट पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण सध्या बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने पंजाबच्या वरच्या फळीला जोरदार धक्केही दिले होते. अशात बुमराहविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याची हिंमत आशुतोष दाखवल्याने त्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, सामन्यानंतर या शॉटबद्दल आशुतोषने सांगितले की हा शॉट म्हणजे त्याची स्वप्नपूर्ती झाल्यासारखेही आहे. तो म्हणाला, 'बुमराहला स्वीप शॉट खेळणे माझे स्वप्न होते. मी या शॉटचा सराव केला होता, पण मी तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध मारला.' यानंतर तो मजेने म्हणाला, 'पण ठिक आहे, हा खेळाचाच एक भाग आहे.'

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मुंबईने दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने 77 धावांवरच 6 विकेट्स गमावलेल्या असताना आशुतोष या सामन्यात फलंदाजीला आला.

Jasprit Bumrah | Ashutosh Sharma | IPL 2024
PBKS vs MI: आशुतोषने थोडं टेन्शन दिलं होतं.. निसटत्या विजयानंतर हार्दिकने केलं पंजाबच्या पठ्ठ्याचं कौतुक

आशुतोषने आधी 7 व्या विकेटसाठी शशांक सिंगबरोबर 34 धावांची भागीदारी केली. पण शशांक 41 धावा करून बाद झाल्यानंतर त्याने स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेत आक्रमक खेळ केला. त्याने यावेळी 8 व्या विकेटसाठी हरप्रीत ब्रारबरोबर 57 धावांची भागीदारी केली.

मात्र, आशुतोष 61 धावांवर बाद झाला. अवघ्या 28 चेंडूत त्याने 2 चौकार आणि 7 षटकार मारत ही खेळी केली होती. त्याच्या खेळीने पंजाब विजयाच्या जवळही पोहचले होते. परंतु, तो बाद झाल्यानंतर पंजाबचा संघ 19.1 षटकात 183 धावांवर संपला. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 53 चेंडूत 78 धावांची खेळी केली. पंजाबकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या. (Ashutosh Sharma Six to Jasprit Bumrah in PBKS vs MI IPL 2024 Match)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com