भारताने युद्धात पाकिस्तानची जीरवल्यानंतर आता क्रिकेटच्या मैदानावर भारत वरचढ ठरतोय. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान सुपर लीग २०२५ सर्व प्रयत्न करतोय, परंतु वारंवार तोंडावर आपटतोय. India Pakistan War मुळे दोन्ही स्पर्धा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. BCCI ने आयपीएलच्या सुधारित तारखा जाहीर केल्यानंतर PSL नेही घाई केली आणि एकाच दिवशी म्हणजे १७ मे पासून स्पर्धा सुरू होणार असल्याचे जाहीर केले. आता आधीच पाकिस्तानात जाण्यासाठी घाबरत असलेल्या परदेशी खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी आयपीएलची निवड करणे योग्य समजले.