Deepak Chahar BCCI 2011 Decision
Deepak Chahar BCCI 2011 Decision esakal

IPL ला मुकलेल्या दीपक चाहरची BCCI च्या एका निर्णयाने होणार चांदी

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) खेळू शकणार नाही. चेन्नईने आयपीएलच्या मेगा लिलावात चाहरला आयपीएल मोठी बोली लावून सीएसकेने आपल्या गोटात पुन्हा घेतले होते. सीएसकेने दीपक चाहरसाठी 14 कोटी रूपये मोजले. मात्र हा 14 कोटीचा (14 Crore) खेळाडू सीएसकेकडून एकही सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, दीपक संपूर्ण या पीएलमधून बाहेर गेल्यानंतर त्याला बोली लागलेली 14 कोटींची रक्कम मिळणरा की नाही याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, दीपक चहरला बीसीसीआयने 2011 मध्ये घतलेल्या एका निर्णयाचा (BCCI Rule) चांगलाच फायदा होताना दिसत आहे. जरी दीपकला 14 कोटी मिळणार नसले तरी त्याचा खिसा पूर्णपणे रिकामा राहणार नाही याची काळजी बीसीसीआयने घेतली आहे.

 Deepak Chahar BCCI 2011 Decision
राहुल 'खास' क्लबमध्ये झाला सामील; विराट 'विक्रम' मात्र अजून दूरच

बीसीसीआने 2021- 22 च्या हंगामात दीपक चाहरला केंद्रीय करारात सामील करून घेतले. यापूर्वी दीपक चाहर केंद्रीय करारात समाविष्ट नव्हता. मात्र त्याने गेल्या वर्षी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याला केंद्रीय करारात सामील करून घेण्यात आले. यामुळेच आयपीएलमध्ये त्याला मिळालेली रक्कम दुखापतीमुळे बाहेर रहावे लागल्यानंतरही मिळणार आहे.

 Deepak Chahar BCCI 2011 Decision
आयपीएलची सांगता करण्यासाठी बीसीसीआय मागवणार निविदा

काय आहे 2011 चा नियम

आयपीएलमध्ये 2011 मध्ये एक नवा नियम करण्यात आला. ज्या नियमाअंतर्गत बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील कोणताही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नाही. (आयपीएल सुरू होण्यापूर्वी) तर त्या खेळाडूला लिलावात मिळालेली रक्कम इन्शुरन्स कंपनीद्वाने मिळणार. बीसीसीआय आपल्या केंद्रीय करारातील सर्व खेळाडूंचा वीमा काढते. त्यात एखादा खेळाडू दुखापतीमुळे त्या सत्राला मुकला तर बोर्ड त्या खेळाडूला वीमेद्वारे त्याची रक्कम चुकवेल. नियमानुसार करार झालेला खेळाडूची अर्धी रक्कम बीसीसीआय आणि उरलेली अर्धी रक्कम फ्रेंचायजी भरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com