GT vs RR सामन्यात पाऊस आला तर... बीसीसीआयचा नवा बॅकअप प्लॅन काय? | BCCI announce Guideline If IPL 2022 Play Off Matches Wash Out | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI announce Guideline If IPL 2022 Play Off Matches Wash Out

GT vs RR सामन्यात पाऊस आला तर... बीसीसीआयचा नवा बॅकअप प्लॅन काय?

कोलकाता : आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना 24 मे रोजी कोलकात्याच्या इडन गार्डवर होणार आहे. गुजारात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सामन्यात पावसाचा खेळ सुरू झालाच तर काय करायचं याचा बॅकअप प्लॅन बीसीसीआयने तयार केला आहे. जर समजा सामने झाले नाही तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा विजेता ठरवला जाईल. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर एकाही षटकाचा खेळ झाला नाही तर लीगच्या गुणतालिकेनुसार विजेत्याची घोषणा केली जाईल. (BCCI announce Guideline If IPL 2022 Play Off Matches Wash Out)

हेही वाचा: हरियाणाच्या क्रिकेटपटूने ऋषभ पंतला दीड कोटींना घातला गंडा?

बीसीसीआयचे हे नियम दोन्ही क्वालिफायर आणि एक एलिमनेटर सामन्यावरही लागू होणार आहेत. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी 30 मे हा राखीव दिवस आहे. फायनल रात्री आठ वाजता खेळवली जाणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तर प्ले ऑफचे पहिले दोन सामने कोलकात्यात होणार आहेत. येथे वादळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिला क्वालिफायर सामना हा गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. तर एलिमनेटर सामना लखनौ सुपर जायंट आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. तर दुसरा क्वालिफाय आणि फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.

हेही वाचा: Women T20 Challenge : 'ही तर महिला आयपीएलची पायाभरणी'

  • आयपीएलच्या मार्गदर्शक तत्वानुसार 'जर पावसाचा व्यत्यय आला तर प्ले ऑफचा सामना कमीतकमी 5 षटकांचा तरी खेळवण्यात यावा.

  • जर पाच षटकांचा खेळ देखील अतिरिक्त वेळेत होत नसतील तर सामन्याचा विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाईल.

  • जर सुपर ओव्हर देखील खेळवणे शक्य नसेल तर लीग स्टेजमधील गुणतालिकेनुसार जो संघ वरच्या स्थानावर असेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल.

  • जर 29 मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये देखील पावसामुळे व्यत्यय आला आणि ठरलेल्या वेळेत खेळ होत नसेल तर राखीव दिवशी 30 मे ला हा सामना सामना आहे त्या स्थितीत खेळवला जाईल.

Web Title: Bcci Announce Guideline If Ipl 2022 Play Off Matches Wash Out Due To Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainIPLBCCIIPL 2022
go to top