
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले होत. विजेतेपद मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी (४ जून) आरसीबी संघ बंगळुरूमध्ये सेलिब्रेशन करणार होता. त्यांची विजयी मिरवणूकही काढण्यात येणार होती, पण ट्रॅफीकच्या कारणाने ती रद्द करण्यात आलेली.
पण आरबीसी संघाचा एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सन्मान करण्यात आला. पण याचवेळी बाहेर मात्र मोठी दुर्घटना घडली. लाखोंच्या संख्येत आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये ११ जणांनी प्राण गमावले, तर अनेकजण जखमी झाले. त्यामुळे आरसीबी संघ, कर्नाटक सरकार आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर टीकाही झाली.