
स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल याच्याकडे बीसीसीआयने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता कर्णधारपदाची माळ गिलच्या गळ्यात पडली आहे. भारतीय संघाला पुढच्या महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे.
या मालिकेसाठी संघाची घोषणा करताना शनिवारी निवड समितीने गिलला कर्णधार केले. या घोषणेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकने स्पष्ट केले होते की गिलची कर्णधार म्हणून निवड करताना बराच विचार करण्यात आला आणि अनेकांचा सल्लाही विचारण्यात आला होता.