IPL 2024 : चेन्नई-बंगळूर आज सलामी ; ऋतुराजच्या नेतृत्वाची कसोटी

महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वाचा बॅटन पास केल्याची चर्चा टिपेला पोहचलेली असतानाच चेन्नईचा संघ गतविजेतेपदाचा मुकुट परिधान करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाशी दोन हात करायला मैदानात उतरत आहे.
IPL 2024
IPL 2024sakal

चेन्नई, ता. २१ (पीटीआय) : महेंद्रसिंग धोनीने नेतृत्वाचा बॅटन पास केल्याची चर्चा टिपेला पोहचलेली असतानाच चेन्नईचा संघ गतविजेतेपदाचा मुकुट परिधान करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाशी दोन हात करायला मैदानात उतरत आहे. कर्णधार म्हणून धोनी माहात्म्याचा लौकिक सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या ऋतुराजच्या शिरावर लगेचच मोठी जबाबदारी आली असली, तरी संयमी आणि तेवढाच कणखर असलेला ऋतुराज गायकवाड हे आव्हान पेलण्यास सज्ज झाला आहे.

चेन्नईने आयपीएलची पाच अजिंक्यपदे मिळवलेली आहेत; तर विराट कोहली प्रमुख चेहरा असलेल्या बंगळूर संघाचा वारंवार अपेक्षाभंग झालेला आहे. अब की बार... अब की बार... असा नारा ते प्रत्येक आयपीएलच्या वेळी देत असले, तरी यंदा तरी यशस्वी होणार का, हा मोठा प्रश्न आहे. यंदा त्यांच्या महिला संघाने महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवल्याचे मानसिक पाठबळ मिळाले आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर खेळणारा विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डुप्लेसी यांच्यावर बंगळूर संघाची मदार आहे.

संघ : चेन्नई : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शैक रशीद, मिचेल सँटनर, सिरमजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महीश तीक्षाना, राचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रेहमान.

IPL 2024
IPL 2024 : आयपीएलची धुळवड आजपासून ; पहिल्या टप्प्यात १७ दिवसांत २१ सामन्यांची मेजवानी

बंगळूर : फाफ डुप्लेसी (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत. दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅकस्, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयांक डागर, विजयकुमार वैशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांक्शू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंग आणि सौरव चौहान.

राचिन रवींद्रवर लक्ष

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत कमालीची छाप पाडल्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला राचिन रवींद्र चेन्नईसाठी हुकमी खेळाडू ठरू शकेल. त्याच्याच देशाचा डेव्हन कॉन्वे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे राचिन रवींद्रवरची जबाबदारी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com