CSK vs DC : चेन्नईने जाता जाता दिल्लीचे 'प्ले ऑफ' गणित बिघडवले

Chennai Super Kings Defeat Delhi Capitals DC Play Off
Chennai Super Kings Defeat Delhi Capitals DC Play Off ESAKAL

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव करत त्यांचे प्ले ऑफचे गणित अवघड करून टाकले आहे. चेन्नईने ठेवलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संपूर्ण संघ 117 धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. सीएसकेकडून मोईन अलीने 3 तर सिमरजीत, ब्राव्हो आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दिल्लीकडून मार्शने सर्वाधिक 25 तर शार्दुल ठाकूरने 24 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेने डेवॉन कॉनवॉयच्या 87 आणि ऋतुराज गायकवाडच्या 48 धावांच्या जोरावर 208 धावा उभारल्या. (Chennai Super Kings Defeat Delhi Capitals DC Play Off Equation became Tough)

Chennai Super Kings Defeat Delhi Capitals DC Play Off
आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांचे दोन्ही सलामीवीर पॉवर प्लेमध्येच माघारी गेले. सलामीवीर श्रीकार भारत अवघ्या 8 धावा करून माघारी गेला. त्यानंतर महीश तिक्षाणाने दिल्लीला मोठा धक्का दिला. त्याने डेव्हिड वॉर्नरला 19 धावांवर बाद करत दिल्लीला पॉवर प्लेमध्येच दुसरा धक्का दिला.

दिल्लीचे मधल्या फळीतील फलंदाज मिशेल मार्श आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र मोईन अलीने 25 धावा करणाऱ्या मार्शला बाद करत ही जोडी फोडली. मोईन अलीने 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 21 धावा करणाऱ्या ऋषभचा त्रिफळा उडवला. त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या रिपल पटेलला बाद करत दिल्लीची अवस्था 5 बाद 81 अशी केली.

निम्मा संघ माघारी गेल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलकडे आस लावून बसली होती. मात्र मुकेश चौधरीने त्याचा 1 धावेवर त्रिफळा उडवून दिला. त्यानंतर याच षटकाच्या 5 व्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलला देखील 3 धावांवर बाद करत दिल्लीचा शेवटचा दर्जेदार फलंदाज माघारी धाडला. त्यानंतर शार्दुलने दिल्लीला शतक पार करून दिला. मात्र अखेरीस ब्राव्होने 18 व्या षटकात 24 धावा करणाऱ्या शार्दुल आणि खलील अहमदला पाठोपाठ बाद करत दिल्लीचा डाव 117 धावात संपवला.

Chennai Super Kings Defeat Delhi Capitals DC Play Off
'मान ताठ करून चाल नाही तर तुझा मुकूट खाली पडेल'

आयपीएलच्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 208 धावा केल्या. सीएसकेचे सलामीवीर डेवॉन कॉनवॉय आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी 10 षटकाताच शतकी सलामी देत दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली.

मात्र ही शतकी सलामी नॉर्त्जेने फोडली. त्याने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाडला 48 धावांवर बाद केले. दरम्यान, अर्धशतक पूर्ण केलेल्या कॉनवॉयने शिवम दुबेच्या साथीने डाव पुढे नेला. या दोघांनी 150 चा टप्पा गाठून दिला. दरम्यान, कॉनवॉय आपल्या शतकाजवळ पोहचला होता. मात्र खलीलने त्याला 87 धावांवर बाद करत त्याचे शतक होऊ दिले नाही.

कॉनवॉय बाद झाल्यानंतर मार्शने 19 चेंडूत 32 धावा करणाऱ्या दुबेला देखील पॅव्हेलियनमध्ये धाडले. कॉनवॉय बाद झाल्यानंतर सीएसकेच्या इतर फलंदाजांना फारकाळ टिकाव धरता आला नाही. याला अपवाद ठरला तो धोनी. त्याने 8 चेंडूत 21 धावा करत सीएसकेला 208 धावांपर्यंत पोहचवले. दिल्लीकडून नॉर्त्जेने 3 तर खलील अहमदने 2 विकेट घेतल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com