आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'

आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'

IPL 2022 : आरसीबीच्या (Royal Challenger Bangalore) वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) दमदार गोलंदाजी करत हैदराबादचा निम्मा संघ माघारी धाडला. या जोरावर आरसीबीने हैदराबादचा डाव 125 धावात गुंडाळला. आरसीबीने सामना 67 धावांनी जिंकत 14 गुणांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने झुंजार खेळी करत 38 चेंडूत 48 धावा केल्या. आरसीबीने कर्णधार फाफ ड्युप्लेसिसच्या नाबाद 73, दिनेश कार्तिकच्या 8 चेंडूत केलेल्या नाबाद 30 धावांच्या जोरावर 20 षटकात 3 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली. (Royal Challenger Bangalore Defeat Sunrisers Hyderabad But Still On Edge of Play Off )

आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'
SRH vs RCB : हसरंगाचा पंजा; RCB चा दणदणीत विजय

आरसीबीने जरी आजचा सामना जिंकून 14 गुण मिळवले असले तरी त्यांचे एकूण 12 सामने झाले आहेत. त्यांचे उरलेले दोन सामने हे पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स विरूद्ध होणार आहेत. सध्या गुणतालिकेत 16 गुणांच्या दोन आणि 14 गुणांच्या दोन टीम आहेत. त्यामुळे आरसीबीला पुढचा पंजाबचा सामना जिंकवाच लागले. कराण पंजाब सध्या 11 सामने खेळून 10 गुणांवर आहे. जर त्यांनी आरसीबी सकट सर्व सामने जिंकले तर ते 16 गुणांवर जातील. त्यावेळी आरसीबीचा खेळ बिघडू शकेल. त्यामुळे 13 मे ला पंजाबला हरवून सेफ झोनमध्ये राहण्यासाठी आरसीबीला कंबर कसावी लागणार आहे.

आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'
Virat Kohli | बॅडपॅचमधल्या विराटला शोएबने दिला खास सल्ला

आरसीबीचे 193 धावांचे विजयाचा अव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. केन विल्यमसन शुन्यावर धावबाद झाला. तर अभिषेक शर्माला सुचितने पाचव्या चेंडूवर शुन्यावर बाद केले.

यानंतर माक्ररम आणि राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र हसरंगा गोलंदाजीला आला आणि त्याने हैदराबादच्या एक एक करून सगळ्या फलंदाजांना माघारी धाडण्यास सुरूवात केली. त्याने माक्ररमला 21 धावांवर बाद केले. त्या पाठोपाठ 19 धावांचे योगदान देणारा निकोलस पूरन देखील हसरंगाची शिकार झाला.

हसरंगा इथेच थांबला नाही. त्याने जगदीशा सुचित, शशांक सिंह आणि उमरान मलिक यांची देखील शिकार केली. हसरंगाने 4 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. अखेर हर्षल पटेलने भुवनेश्वर कुमारला बाद करत हैदराबादचा डाव 125 धावात संपुष्टात आणला.

आरसीबीचा दणदणीत विजय मात्र 'पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त'
लिव्हिंगस्टोनला मनमानी कारभार भोवला; कृष्णाने केली शिकार

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. विराट कोहलीला सुचितने पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले. मात्र यानंतर कर्णदार फाफ ड्युप्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीला सावरत शतकी भागीदारी रचली. या दोघांनी 12 व्या षटकात आरसीबीला शतकी मजल मारून दिली. ड्युप्लेसिसने दमदार अर्धशतक ठोकले. मात्र रजत पाटीदाला अर्धशतकापासून वंचित रहावे लागले. त्याला सुचितनेच 48 धावांवर बाद केले.

पाटीदार बाद झाल्यानंतर ड्युप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने आरसीबाला 150 च्या पार पोहचवले. मात्र 19 व्या षटकात कार्तिक त्यागीने मॅक्सवेलला 33 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने आल्या आल्या आपला जवला दाखवायला सुरूवात केली. त्याने 8 चेंडूत 30 धावा ठोकून आरसीबीला थेट 192 धावांपर्यंतच पोहचवले. त्याच्या या छोट्या पण धडाकेबाज खेळीत त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने 50 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com