Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad
Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabadesakal

CSK vs SRH : सीएकेने कर्णधाराबरोबर रिझल्टही बदलला

पुणे : चेन्नईचा कर्णधार बदलला अन् संघ विजयी ट्रॅकवर परतला. चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करत हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला. सीएसकेचे 203 धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 6 बाद 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत 64 धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 4 बळी टिपले. तर फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने 99 तर डेव्हॉन कॉनवॉयने 85 धावा केल्या. (Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad in MS Dhoni Captaincy)

चेन्नईने 203 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर मुकेश चौधरीने हैदराबादला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने अभिषेक शर्माला 39 धावांवर तर राहुल त्रिपाठीला शुन्यावर बाद केले. माक्रमही (17) फार काही करू शकला नाही.

Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad
पुण्याच्या ऋतुराजने 'पुण्यात' षटकार मारत केला मैलाचा दगड पार

दुसऱ्या बाजूला सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन चेन्नईच्या 202 धावांचा पाठलाग करताना दमदार फलंदाजी करत होता. मात्र प्रेटोरियसने त्याची ही 37 चेंडूत केलेली 47 धावांची खेळी 15 व्या षटकात संपवली. 18 व्या षटकात सीएसकेने आपले दीडशतक पार केले होते. मात्र मुकेश चौधरीने शशांक सिंहला 15 धावांवर बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला. पाठोपाठ चौधरीने वॉशिंग्टन सुंदरला 2 धावांवर बाद करत आपली चौथी शिकार केली.

दरम्यान, निकोलस पूरनने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून एकाकी झुंज दिली. अखेर हैदराबादला 20 षटकात 6 बाद 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. पूरनने 34 चेंडूत 64 धावा केल्या.

Chennai Super Kings Defeat Sunrisers Hyderabad
उमरान मलिकच्या हंगामातील सर्वात 'वेगवान' चेंडूवर ऋतुराजचे अर्धशतक

नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादने प्रथम चेन्नई सुपर किंग्जला फलंदाजीला पाचारण केले. चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनवॉयने संघाला आश्वास सुरूवात केली. त्यांनी सीएसकेला पॉवर प्लेमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारून दिली.

ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपल्या आयपीएलमधील 1000 धावा (IPL 1000 Runs) पूर्ण केल्या. त्याने मार्को येनसेलना षटकार मारत हा मैलाचा दगड पार केला. ऋतुराज गायकवाड एवढ्यावरच थांबला नाही त्याने पॉवर प्लेनंतर आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. याचबरोबर संघाला 10 षटकात बिनबाद 85 धावांपर्यंत पोहचवले. अर्धशतकानंतर ऋतुराजने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, कॉनवॉयने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 182 धावांची सलामी दिली. दरम्यान, ऋतुराज गायकवाड शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र टी नटराजनने ऋतुराजला 99 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. ऋतुराजचे अवघ्या 1 धावेने शतक हुकले.

ऋतुराज बाद झाल्यानंतर आलेल्या महेंद्रसिंह धोनीने एका चौकारासह 7 चेंडूत 8 धावा केल्या. मात्र तो 20 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. अखेर डेव्हिड कॉनवॉयने 55 चेंडूत केलेल्या 85 धावांच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 2 बाद 202 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com