पुण्याच्या ऋतुराजने 'पुण्यात' षटकार मारत केला मैलाचा दगड पार | Ruturaj Gaikwad IPL Records | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad IPL Records

पुण्याच्या ऋतुराजने 'पुण्यात' षटकार मारत केला मैलाचा दगड पार

पुणे : आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध दमदार सुरूवात केली. पुण्यात सुरू असलेल्या या सामन्यात लोकल बॉय ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) दमदार फलंदाजी करत चेन्नईला चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. त्याने डेव्हॉन कॉनवॉयच्या साथीने नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दरम्यान, ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये एक मैलाचा दगड पार केला.

ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपल्या आयपीएलमधील 1000 धावा (IPL 1000 Runs) पूर्ण केल्या. त्याने मार्को येनसेलना षटकार मारत हा मैलाचा दगड पार केला. ऋतुराज गायकवाड एवढ्यावरच थांबला नाही त्याने पॉवर प्लेनंतर आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. याचबरोबर संघाला 10 षटकात बिनबाद 85 धावांपर्यंत पोहचवले. अर्धशतकानंतर ऋतुराजने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, कॉनवॉयने देखील आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी 182 धावांची सलामी दिली. दरम्यान, ऋतुराज गायकवाड शतकाच्या जवळ पोहचला होता. मात्र टी नटराजनने ऋतुराजला 99 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. ऋतुराजचे अवघ्या 1 धावेने शतक हुकले.

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात कर्णधारासह काही बदल केले. चेन्नईचे कर्णधारपद पुन्हा एकदा एमएस धोनीकडे (MS Dhoni) आले आहे. याचबरोबर संघात ब्राव्हो आणि शिवम दुबे ऐवजी डेव्हॉन कॉनवॉय आणि सिमरजीत सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नई फक्त दोन सामनेच जिंकण्यात यशस्वी झाले आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे.