
चेन्नई सुपर किंग्स, हे इंडियन प्रीमियर लीगमधील नेहमीच गाजणारे नाव आहे. सर्वात यशस्वी संघांपैकी असलेला हा संघ यंदा १८ व्या हंगामात सहावे विजेतेपद जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत.
चेन्नईने आता ऋतुराज गायकवाडच्या नाववरच कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्येही ऋतुराज चेन्नईचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. त्याला या हंगामातही एमएस धोनीची साथ मिळणार आहे. धोनी संघात असणं चेन्नईसाठी दिलासा देणारे आहे. त्याला ४ कोटी रुपयांना चेन्नईने संघात रिटेन केलं आहे.