
राजस्थान रॉयल्सला रविवारी पंजाब किंग्सविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत १० धावांनी पराभवाचा धक्का बसला. राजस्थानचा हा १३ सामन्यातील १० वा पराभव ठरला. राजस्थानने या सामन्याप्रमाणेच यापूर्वीही काही सामने विजयाच्या जवळ येऊनही गमावले आहेत.
रविवारी जयपूरला झालेल्या सामन्यात पंजाबने २२० धावांचे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जैस्वाल (५०) आणि १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (४०) दमदार सुरुवात दिली होती.
त्यांनी आक्रमक खेळताना ४.५ षटकातच पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली होती. नंतर ध्रुव जुरेलनेही ५३ धावांची आक्रमक खेळी केली. पण असे असतानाही राजस्थानला २० षटकात ७ बाद २०९ धावाच करता आल्या.