Ravindra Jadeja | IPL | CSK
Ravindra Jadeja | IPL | CSKSakal

Ravindra Jadeja: अन् अखेर जडेजा झाला 'क्रिकेट थलापती', CSK ची मोठी घोषणा; जाणून घ्या नक्की भानगड काय

Chennai Super Kings: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जडेजाबाबत एक खास घोषणा केली आहे.

Ravindra Jadeja Nickname: चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी (7 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 22 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला.

एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला विजय मिळवून देण्यात अष्टपैलू रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

दरम्यान, सामन्यानंतर जडेजाने एक खंत बोलून दाखवली होती, ज्यावर आता चेन्नई सुपर किंग्सने त्याची ही खंत दूर केली आहे. खरंतर चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या काही खेळाडूंना टोपन नाव दिले आहे.

Ravindra Jadeja | IPL | CSK
Djokovic - Bopanna Video: आम्ही ओल्ड, पण गोल्ड...!, टेनिसमध्ये इतिहास रचणाऱ्या जोकोविच-बोपन्नाचा जगाला इशारा

धोनीला तर गेल्या अनेक वर्षांपासून चेन्नईच्या चाहत्यांनी थाला या नावाने प्रेमाने स्विकारले आहे. त्यामुळे अनेकदा धोनीला 'थाला' या टोपन नावानेही संबोधले जाते. धोनीप्रमाणेच चेन्नईचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला 'चिन्ना थाला' असे टोपन नाव देण्यात आले आहे, तर कर्णधार ऋतुराजला 'रॉकेट राजा' म्हटलं जातं.

त्याचप्रमाणे जडेजालाही असं काही नाव मिळालं आहे का, याबद्दल त्याला सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर प्रेझेंटेटर हर्षा भोगले यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी 'क्रिकेट थलापती' हे नावही सुचवले.

त्यावर जडेजा म्हणाला होता की 'माझं नाव अद्याप कोणी व्हेरिफाय केलेलं नाही, आशा आहे की ते मला असं कोणतंतरी नाव देतील.'

जडेजाने ही खंत बोलून दाखवल्यानंतर मात्र लगेचच काही वेळात चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट करत बोल्ड अक्षरात लिहिले की 'क्रिकेट थलापती म्हणून व्हेरिफाईड'.

थोडक्यात आता जडेजाला जड्डू, बापू आणि सर नंतर आता चेन्नईच्या चाहत्यांकडून थलापती हे नवे टोपननाव मिळाले आहे. त्यामुळे सध्या त्याची चर्चा सुरू आहे.

Ravindra Jadeja | IPL | CSK
Ravindra Jadeja: जड्डूचा यु-टर्न अन् थालाची धमाकेदार एंट्री! प्रेक्षकांसह CSK च्या डगआऊटमध्येही हास्याचा फवारा, Video Viral

थलापती म्हणजे काय?

खरंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये थलापती अभिनेता विजयला म्हटले जाते. त्याला त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांमुळे ही ओळख मिळाली होती. पण आता क्रिकेटमध्ये जडेजालाही हे टोपननाव मिळाले आहे. थलापतीचा अर्थ होतो कमांडर किंवा सेनापती.

धोनीला थाला म्हटले जाते, ज्याचा अर्थ नेता असा होतो, तर रैनाला चिन्ना थाला म्हटले जाते, ज्याचा अर्थ उपनेता किंवा नेत्याच्या उजवा हात समजला जाणारा व्यक्ती.

जडेजाची कामगिरी

दरम्यान, सोमवारी झालेल्या सामन्यात जडेजाने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या तिघांच्या विकेट्स घेतल्या तसेच त्याने फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांचे झेलही घेतले.

या सामन्यात कोलकाताचा संघाला 20 षटकात 9 बाद 137 धावाच करता आल्या. त्यानंतर चेन्नईने 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत 138 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराजने नाबाद 67 धावांची खेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com