

Chennai Super Kings
esakal
IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेचा ११ वा सामना काल (५ एप्रिल) दोन बलाढ्य संघात झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूने चेन्नईला ४३ धावांनी हरवल. चेन्नईला या हंगामातील सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. एम. चिन्नास्वामी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या बंगळुरूने २० षटकात ३ बाद २५० धावा केल्या. यामध्ये टीम डेव्हिडने तुफानी खेळी केली.