esakal | IPL 2021 Qualifier 1: दिल्ली की चेन्नई.. कोण भारी? वाचा आकडेवारी
sakal

बोलून बातमी शोधा

DC-vs-CSK

CSK vs DC: आज दोघांमध्ये रंगणार Playoff चा पहिला सामना

IPL Qualifier 1: दिल्ली की चेन्नई.. कोण भारी? वाचा आकडेवारी

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 1: स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल असलेल्या दोन संघांमध्ये पात्रता फेरीचा पहिला सामना रंगणार आहे. दिल्ली गुणतालिकेत २० गुणांसह पहिल्या स्थानी आहे तर चेन्नई १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. हे दोन संघ आज फायनलच्या स्थानासाठी झुंजणार असून त्यापैकी विजेता संघ थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला आणखी एका सामन्याची संधी मिळेल. दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. अशा परिस्थितीत कोणता संघ सामना जिंकेल हे सांगणं कठीण आहे. पाहूया या दोन संघांबद्दलची खास आकडेवारी-

CSK VS DC

CSK VS DC

हेही वाचा: IPL 2021: अश्विनला हेटमायरच्या आधी का पाठवलं? पंत म्हणतो..

CSK vs DC

  • दिल्लीच्या संघाने यंदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दिल्लीचा संघ सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफ फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी ते उपविजेते होते.

  • चेन्नईच्या संघाने गेल्या हंगामात अतिशय निराशाजनक कामगिरी केली होती. त्यातून प्रचंड सुधारणा करत संघाने यंदा गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

  • चेन्नई आणि दिल्ली हे संघ यंदाच्या हंगामात दोन वेळा आमने सामने आले. या दोन्ही सामन्यात दिल्लीच्या संघाने चेन्नईवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली होती आणि सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकात थरारक विजयश्री खेचून आणली होती.

हेही वाचा: पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी

  • दिल्ली आणि चेन्नई हे दोन संघ आतापर्यंत IPL च्या इतिहासात एकूण २५ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी CSKने १५ तर DCने १० सामन्यात विजय मिळवला आहे.

  • प्ले ऑफ फेरीचा विचार केल्यास दिल्लीच्या संघाने चेन्नईविरोधात दोन सामने खेळले असून त्या दोन्ही सामन्यात ते पराभूत झाले.

  • युएईमधील सामन्यांची आकडेवारी मात्र दिल्लीच्या बाजूने असून दिल्ली ३-१ने आघाडीवर आहे.

loading image
go to top