Mustafizur Rahman leaves IPL for Bangladesh : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ ला १७ मेपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ताणलेल्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा आठवड्यासाठी स्थगित करावी लागली होती. परदेशी व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले होते. पण, युद्ध थांबले अन् BCCI ने लीग पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या तारखा पुढे गेल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् आयपीएल असा संघर्ष होताना दिसतोय. त्यात काही परदेशी खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांना प्राधान्य देऊन घरीच थांबले आहेत, तर काही आले आहेत. अशात फ्रँचायझींना तात्पुरती रिप्लेसमेंट निवडण्याचा पर्याय बीसीसीआयने दिला आहे. त्या नियमानुसारच दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी बांगलादेशच्या मुस्ताफिजूर रहमान याला ६ कोटींचं डिल देऊन करारबद्ध केले, पण फ्रँचायझीच्या ट्विटनंतर हा पठ्ठ्या यूएईला रवाना झाला. त्याने ही माहिती ट्विट करूनच दिली.