
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग २०२५ पूर्वी प्रत्येक संघात मोठे बदल घडले आहेत, याला दिल्ली कॅपिटल्स देखील अपवाद नाही. दिल्ली संघातही कर्णधारापासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत अनेक मोठे बदल घडले आहेत.
रिषभ पंतला रिलीज केल्यानंतर आता दिल्लीने आयपीएल २०२५ साठी नवा कर्णधार म्हणून अक्षर पटेलची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. आता सोमवारी (१७ मार्च) दिल्लीने उपकर्णधाराचीही घोषणा केली आहे. दिल्लीने हटके पद्धतीने ही घोषणा केली आहे.