
MS Dhoni Controversy: भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. असे फार क्वचित प्रसंग घडले आहेत की ज्यावेळी धोनीचा त्याच्या रागावरील ताबा सुटला आहे. अशीच एक घटना २०१९ आयपीएलवेळी घडली होती, ज्याबद्दल धोनीला पश्चाताप असल्याचा त्याने खुलासा केला आहे.