VIDEO : डेव्हिड वॉर्नर तर बिश्नोईची 'आवडती' शिकार | David Warner Ravi Bishnoi Rivalry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi vs Lucknow David Warner Ravi Bishnoi Rivalry

VIDEO : डेव्हिड वॉर्नर तर बिश्नोईची 'आवडती' शिकार

मुंबई : आयपीएल हंगामातील 15 व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giant) यांच्यात सामना होत आहे. लखनौ सुपर जायंटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याकडे डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) सामना म्हणूनही पाहिले जात होते. जरी हे दोघे फार वेळा समोरासमोर आले नसले तरी या दोघांची एकामेकांविरूद्धची आकडेवारी फारच रंजक आहे.

हेही वाचा: IPL 2022 : आता मुंबई इंडियन्स देखील 'कमिन्स मार्गा'वर चालणार

रवी बिश्नोई आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघेही फक्त 2 डावात एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी रवी बिश्नोईने वॉर्नरला फक्त 4 चेंडू टाकले होते. मात्र यात त्याने 2 वेळा त्याला बाद करत द्वंद्वयुद्धात आघाडी घेतली होती. आजच्या सामन्यात या द्वंद्व युद्धाचा पुढचा अंक कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष होते. आजच्या सामन्यात देखील रवी बिश्नोईने डेव्हिड वॉर्नरवरील आपले वर्चस्व गाजवले. त्याने दोन चेंडूतच वॉर्नरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे बिश्नोई - वॉर्नर द्वंद्व युद्धातील आजची परिस्थिती ही 3 डाव, 6 चेंडू, 5 धावा आणि 3 बळी अशी झाली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र केसरी बाळा रफिकला पराभवाचा धक्का

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने दमदार सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वी शॉने धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीला पॉवर प्लेमध्ये 52 धावा केल्या. मात्र त्यानंतर रवी बिश्नोई आणि कृष्णाप्पा गौतमने दिल्लीला धक्के दिले. बिश्नोईने डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉव्हेलला बाद केले. तर कृष्णाप्पा गौतमने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉला 61 धावांवर बाद केले. यानंतर आलेल्या सर्फराज खान (36) आणि ऋषभ पंतने (39) आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटच्या तीन षटकात दिल्लीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दिल्लीला 149 धावात रोखले.

Web Title: Delhi Vs Lucknow David Warner Ravi Bishnoi Rivalry In Ipl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..