Dinesh Karthik Retirement : अखेर डीके झाला निवृत्त! 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला लागला ब्रेक

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिकने आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती.
Dinesh Karthik
Dinesh Karthik ipl Retirement esakal
Updated on

Dinesh Karthik Retirement IPL 2024 : आरसीबीचा मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने अखेर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं आपली 16 वर्षाची दीर्घ कारकीर्द नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपवली. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 6 संघांकडून खेळला. त्यानं केकेआरचं नेतृत्व देखील केलं होतं. अखेर त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सांगता ही आरसीबीमध्येच झाली. आरसीबीच्या खेळाडूंनी देखील डीकेला गार्ड ऑफ ऑनर देत त्याची पाठवणी केली.

Dinesh Karthik
RR vs RCB : राजस्थानचा रॉयल कारभार! टप्प्यात आणून केला RCB चा कार्यक्रम

दिनेश कार्तिकने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 257 सामन्यात 4842 धावा केल्या. त्यात त्याने 22 अर्धशतकी खेळी केल्या. दिनेश कार्तिकचा आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. सहा संघांकडून आयपीएल खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2008 मध्ये आपली आयपीएल कारकीर्द सुरू केली होती.

त्यानंतर 2011 मध्ये तो पंजाब किंग्जकडे गेला. मुंबईकडून दोन हंगाम खेळल्यावर तो 2014 मध्ये पुन्हा दिल्लीकडे गेला.

त्यानंतर आरसीबीने त्याला 2015 मध्ये आपल्या गोटात खेचलं. पुढच्याच हंगामात डीके गुजरात लायन्सकडून खेळला. त्यानंतर 2017 मध्ये केकेआरने त्याला आपल्याकडे खेचत कर्णधार केलं. चार हंगाम केकेआरमध्ये राहिल्यानंतर दिनेश कार्तिक 2022 मध्ये आरसीबीमध्ये परतला. तेथे त्याने मॅच फिनिशर म्हणून नाव कमवालं.

Dinesh Karthik
Rohit Sharma Retirement: धोनी आणि सचिनने रोहितला विचारला रिटायरमेंटचा प्लॅन? हिटमॅनने दिलं थेट उत्तर

त्यानंतर त्यानं टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात देखील पुनरागमन केलं. यंदाच्या हंगामाच्या सुरूवातीलाच दिनेश कार्तिकने आपला हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचं सांगितलं होतं. त्याचा हा आयपीएलचा 17 वर्षाचा प्रवास अखेर आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपुष्टात आला.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.