esakal | IPL 2021: KKRशी हारल्यानंतर RCBच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

RCB-Dressing-Room-Emotional

व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील...

KKRशी हारल्यानंतर RCBच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? (Video)

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Eliminator: विराट कोहलीच्या RCB संघाला कोलकाताकडून पराभूत व्हावे लागले. RCB चा कर्णधार म्हणून हा विराटचा शेवटचा सामना ठरला. विराटने या सामन्यात फारशी चांगली कामगिरी केली नाही. विराटच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १३८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने शेवटच्या षटकात १३९ धावा केल्या. विराटची RCBचा कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आली. या सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये अगदी शांत वातावरण दिसून आले.

हेही वाचा: विराटने RCBसाठी ट्रॉफी न जिंकणं म्हणजे... - सुनील गावसकर

संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी सर्व खेळाडूंच्या भावना व्हिडीओच्या माध्यमातून मांडल्या. एबी डिव्हिलियर्सनेही भावनिक शब्दात आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण स्पर्धेत ज्या ज्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून दाखवली त्या खेळाडूंचे हेसन यांनी कौतुक केले. तसेच, विराटने संघासाठी ज्या योजना राबवल्या आणि संघाला जी उंची गाठून दिली त्यासाठी सर्व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. परंतु, स्वप्नवत वाटणाऱ्या प्रवासाला अचानक ब्रेक लागल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण थोडेसे दुखाचेच होते.

हेही वाचा: RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

दरम्यान, पुढच्या वर्षी विराट कोहली RCB कडून खेळताना दिसला तरी तो कर्णधार म्हणून खेळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. RCB चा कर्णधार म्हणून विराटने तब्बल १४० सामने खेळले. त्यातील विराटची कामगिरी-

  • सामने - १४०

  • विजय - ६६

  • पराजय - ७०

  • अनिर्णित - ०४

  • विजयाची टक्केवारी - ४८ .५२

loading image
go to top