

GAVASKAR SLAMS BUMRAH NO-BALL
esakal
GAVASKAR SLAMS BUMRAH NO-BALL: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा ४७ वा सामना काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स(Lucknow Super Giants) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौला ४ गडी राखून पराभूत केलं. या हंगामात हा मुंबईचा केवळ तिसरा विजय आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात सलामीचा सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स विजयासाठी संघर्ष करत होती.