
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्सने घरच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सला शनिवारी (१९ एप्रिल) झालेल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने विजय मिळवत यंदाच्या हंगामातील पाचव्या विजयाची नोंद केली. तर दिल्लीचा हा दुसराच पराभव ठरला आहे.
हा सामना जॉस बटलरच्या आक्रमक फलंदाजीने गाजवला. त्याने या सामन्यात त्याचं शतक थोडक्यात हुकलं.