IPL 2024: गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई, चेन्नईविरुद्ध झालेली 'ही' चूक भोवली

Gujarat Titans captain Shubman Gill fined : चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलवर एका चूकीसाठी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Shubman Gill | Gujarat Titans | IPL 2024
Shubman Gill | Gujarat Titans | IPL 2024Sakal

Gujarat Titans captain Shubman Gill fined : इंडियन सुपर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा धक्का बसला.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातला ६३ धावांनी पराभूत व्हावे लागले. आयपीएल 2024 मधील हा गुजरातचा पहिला पराभव आहे. मात्र, पराभवानंतर गुजरातला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात गुजरातकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .

Shubman Gill | Gujarat Titans | IPL 2024
IPL 2024 mi vs srh : मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयाची आस ; हार्दिक पंड्या-पॅट कमिन्सचे नेतृत्व पणाला

आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार गुजरात टायटन्सने आयपीएलच्या आचार संहितेतील नियमाचा भंग करण्याची ही 17 व्या आयपीएल हंगामातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गिलवर कर्णधार म्हणून 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नियमानुसार 90 मिनिटांच्या आत संघाला 20 षटके पूर्ण करावी लागतात. षटकांची गती कमी राखल्याची चूक पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर 12 लाखांचा दंड ठोठावला जातो.

तसेच दुसऱ्यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर 24 लाखांचा दंड आणि प्लेइंग इलेव्हनमधील इतक खेळाडूंवर 6 लाख किंवा सामना शुल्काच्या 25 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावण्यात येतो.

Shubman Gill | Gujarat Titans | IPL 2024
IPL 2024, CSK vs GT: अजिंक्य रहाणेने सूर मारत पकडला मिलरचा 'किलर' झेल, Video होतोय व्हायरल

तसेच तर हीच चूक तिसऱ्यांदा झाली, तर कर्णधाराला 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी कारवाई केली जाते, याशिवाय संघातील खेळाडूंवर 12 लाखांचा किंवा सामना शुल्काच्या 50 टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंज ठोठावला जातो. यापुढील होणाऱ्या चूकीसाठी हीच कारवाई कायम केली जाते.

दरम्यान, हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केल्यानंतर गिलकडे गुजरातने कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. गुजरातने गिलच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला विजय मिळवला होता. पण त्यानंतर त्यांना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com