
RCB vs GT : विराट खेळीनंतरही आरसीबी हरली!
मुंबई : आयपीएलच्या 43 व्या सामन्यात अखेर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) चांगल्या फॉर्ममध्ये आला. मात्र ही खेळी आरसीबीची पराभवाची मालिका काही खंडीत करू शकली नाही. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्स समोर 171 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 19.3 षटकात पार केले. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 39 तर राहुल तेवतियाने 43 धावांची दमदार खेळी केली. आरसीबीकडून विराट कोहलीने 58 तर रजत पाटीदारने 53 धावांची खेळी केली होती. (Gujarat Titans Defeat Royal Challengers Virat Kohli Back In Form)
हेही वाचा: ब्रेकिंग : चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा धोनीकडे
गुजरात टायटन्स विरूद्ध आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ड्युप्लेसिस शुन्यावर बाद झाल त्यानंतर विराट आणि रजत पाटीदार (52) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करण्यास सुरूवात केली. 18 चेंडूत 33 धावा करणारा मॅक्सवेल मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यानंतर लोमरोरने 8 चेंडूत 16 धावा चोपून आरसीबीला 170 धावांपर्यंत पोहचवले.
हेही वाचा: Video : विराटच्या अर्धशतकानंतर अनुष्काने दिलेली रिअॅक्शन झाली व्हायरल
आरसीबीने ठेवलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहाने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 46 धावा केल्या. मात्र गुजरात टायटन्सला हसगंगाने पहिला धक्का दिला. त्याने वृद्धीमान साहाला 29 धावांवर बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदने गुजरात टायटन्सचा दुसरा सलामीवीर शुभमन गिलला 31 धावांवर बाद केले. शाहबाजने सेट झालेल्या शुभमन गिलला बाद केल्यानंतर हार्दिक पांड्याला देखील अवघ्या 3 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यामुळे गुजरातची अवस्था 4 बाद 95 धावा अशी झाली.
गुजरातने 95 धावांवर 4 फलंदाज बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियाने आक्रमक फलंदाजी करत सामना जिंकून दिला. मिलरने 24 चेंडूत 39 तर राहुल तेवतियाने 25 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली.
Web Title: Gujarat Titans Defeat Royal Challengers Virat Kohli Back In Form
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..