Video : विराटच्या अर्धशतकानंतर अनुष्काने दिलेली रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल | Virat Kohli Half Century Anushka Sharma Reaction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Half Century Anushka Sharma Reaction

Video : विराटच्या अर्धशतकानंतर अनुष्काने दिलेली रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

IPL 2022: विराट कोहलीने (Virat Kohli) गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतक (Half Century) ठोकून आपला बॅड पॅच संपवला. त्याने आयपीएलमधील आपले 43 वे अर्धशतक ठोकले. विराट कोहली सातत्याने फेल जात असताना हे अर्धशतक त्याला खूप दिलासा देणारे ठरले. यंदाच्या आयपीएलमध्ये तो सलग दोन सामन्यात पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर विराट कोहलीने ब्रेक घ्यावा अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अखेर विराटच्या बॅटमधून धावा झाल्या. विराट पुन्हा फॉर्ममध्ये परतल्यानंतर सर्वाधिक आनंद हा त्याची पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma) झाला. तिने स्टँडमध्ये जबरदस्त जल्लोष करत विराटचे अर्धशतक सेलिब्रेट केले.

हेही वाचा: PV Sindhu : पंचांबरोबर वाद; जिंकणारी सिंधू हरली

विराट कोहलीला गेल्या 15 आयपीएल डावात अर्धशतक करता आले नव्हते. मात्र यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी ठरलेला संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध विराट कोहलीने अर्धशतक ठोकून आपला हा धावांचा दुष्काळ संपवला. विराट कोहली अर्धशतकानंतर लगेच बाद झाला मात्र त्याच्या या खेळीतील आत्मविश्वास पाहता त्याच्या बॅटमधून मोठी खेळी साकारण्याची वेळ फार दूर नाही असे जाणवते. विराट कोहलीच्या या अर्धशतकानंतर सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने 53 चेंडूत 58 धावा केल्या. त्याला मोहम्मद शामीने बोल्ड केले. विराटने ही खेळी 6 चौकार आणि 1 षटकाराने सजवली.

हेही वाचा: पहिल्या IPL वेळी कोहली ऐवजी या खेळाडूची केली होती निवड; अजूनही चालूय स्ट्रगल

गुजरात टायटन्स विरूद्ध आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ड्युप्लेसिस शुन्यावर बाद झाल त्यानंतर विराट आणि रजत पाटीदार (52) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर गुजरातच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करण्यास सुरूवात केली. 18 चेंडूत 33 धावा करणारा मॅक्सवेल मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यानंतर लोमरोरने 8 चेंडूत 16 धावा चोपून आरसीबीला 170 धावांपर्यंत पोहचवले.

Web Title: Virat Kohli Half Century Anushka Sharma Reaction Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top