
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू होऊन आता दोन आठवडे होत आहे. पहिल्या दोन आठवड्यात तरी फार मोठे वाद पाहायला मिळाले नव्हते. मात्र नजीकच्या काळात सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात मोठा वाद सुरू असल्याचे समोर आले.
स्टेडियमच्या फ्री पासेसवरून हा वाद झाला होता. पण आता त्यांच्यात समेट झाल्याचे समजत आहे. याबाबत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.