

Team India vs Afghanistan
esakal
India vs Afghanistan Series Schedule Changed: भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यात एक कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जूनमध्ये होणार असून यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा देखील केली आहे. दरम्यान, आधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात आता थोडा बदल करण्यात आला आहे. या मालिकेत एकूण ४ सामने खेळले जाणार आहेत, मात्र त्यापैकी एका सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.