IPL 2021 : फाफची छाप; सेंच्युरीनंतर तोऱ्यात साजरी केली हाफ सेंच्युरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Faf du Plessis

फाफची छाप; सेंच्युरीनंतर तोऱ्यात साजरी केली हाफ सेंच्युरी

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या फायनल लढतीत चेन्नई सुपर किंग्जच्या फाफ ड्युप्लेसिसने अनुभवाची झलक दाखवून दिली. त्याच्या 59 चेंडूतील 86 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 3 बाद 192 धावा केल्या. आयपीएलच्या यंदाच्या फायनलमध्ये मैदानात उतरताच फाफ ड्युप्लेसिसने शंभरावा सामना खेळण्याचा पराक्रम आपल्या नावे नोंदवला. शतकी सामन्यात धमाकेदार अर्धशतकी खेळी करत त्याने संघासाठी मोलाचे योगदान दिले.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार खेचले. यंदाच्या हंगामात त्याने 16 सामन्यातील 16 डावात 633 धावा केल्या. अवघ्या तीन धावानं त्याचे ऑरेंज कॅपपासून तो दूर राहिला. 2012 पासून फाफ ड्युप्लेसिस आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसते. यंदाच्या हंगामात त्याने 6 अर्धशतकाच्या जोरावर सर्वोत्तम 633 धावांची खेळी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 100 सामन्यात त्याच्या नावे 22 अर्धशतकांची नोंद असून 34.94 च्या सरासरीने त्याने 2935 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

फाफ ड्युप्लेसिसने सलामीवीर ऋतूराज गायकवाडच्या साथीनं यंदाच्या हंगामात 744 धावा केल्या आहेत. एका हंगामात सलामीवीरांनी केलेली ही तिसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली या जोडीचा बोलबाला आहे. या जोडीने 2016 च्या हंगामात 939 धावा केल्या होत्या. डेविड वॉर्नर बेयस्ट्रो जोडीनं 2019 च्या हंगामात 756 धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ आता ऋतूराज आणि फाफ ड्युप्लेसिस या जोडीची वर्णी लागली आहे. त्याच्यापाठोपाठ याच हंगामात शिखर धवन पृथ्वी जोडीनं 731 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: MS धोनी... जगात भारी! क्रिकेटच्या इतिहासात केला विश्वविक्रम

फाफ ड्युप्लेसिस आणि ऋतूराज गायकवाड या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचली. ऋतूराज 32 धावा करुन माघारी फिरल्यानंतर फाफनं रॉबिन उथप्पाच्या साथीनं 63 धावांची मजबूत भागीदारी रचली उथप्पाने 15 चेंडूत 31 धावा केल्या. मोईन अलीने 20 चेंडूत नाबाद 37 धावांची खेळी केली. फाफ ड्युप्लेसिस अखेरच्या चेंडूवर झेलबाद झाला. चेन्नईने पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 बाद 192 धावा केल्या आहेत.

loading image
go to top