esakal | RCB च्या पराभवासह हर्षलच्या स्वप्नाचा चक्काचुरा! | RCB vs KKR
sakal

बोलून बातमी शोधा

Harshal Patel

RCB च्या पराभवासह हर्षलच्या स्वप्नाचा चक्काचुरा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवासह हर्षल पटेलच्या विराट विक्रमाची संधीही हुकली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलनं दोन विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ड्वेन ब्रावोच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण या सामन्यातील पराभवासह त्याची ही कामगिरी बरोबरीतच संपुष्टात आली. हर्षल पटेलने 15 सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेलनं व्यंकटेश अय्यरची विकेट घेत ब्रावोच्या विक्रमाशी बरोबरी केली. ड्वेन ब्रावोनं 2013 च्या हंगामात 32 विकेट घेतल्या होत्या. कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांना हर्षल पटेलनंच तंबुचा रस्ता दाखवला. त्याला आणखी एक विकेट मिळाली असती तर आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला असता.

हेही वाचा: Video : विराट कॅप्टन्सीचा शेवट पराभवासह पंचासोबतच्या वादानं

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवासह बंगळुरुचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. त्यामुळे हर्षल पटेल आणि ब्रावो संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत. कोलकाता विरुद्ध 4 षटकांच्या कोट्यात हर्षल पटेलनं 19 धावा खर्च करुन दोन विकेट घेतल्या.

हेही वाचा: KKR च्या सुनील नारायणचा 'मै हूँ.. ना शो' RCB आउट!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास संपुष्टात आल्यानंतरही पर्पल कॅपचा तोच प्रबळ दावेदार आहे. हर्षल पटेल पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या आवेश खान यंदाच्या हंगामातील 15 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी करुन पर्पल कॅपसाठी त्याला आणखी 10 विकेट्स घ्याव्या लागतील. क्वालिफायरनंतर दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये खेळली तरी ते अशक्यप्रायच आहे. या दोघांशिवाय मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं 14 सामन्यात 21 विकेट, पंजाबच्या मोहम्मद शमीने 14 सामन्यात 19 तर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या राशिद खानने 14 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.

loading image
go to top