मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम

मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम
Updated on
Summary

मुंबईचा राजस्थानवर एकतर्फी मोठा विजय

IPL 2021 MI vs RR: मुंबई इंडियन्सच्या संघाने महत्त्वाच्या लढतीत राजस्थानचा धुव्वा उडवला. मुंबईने अवघ्या ९ षटकात राजस्थानने दिलेले आव्हान पार केले. राजस्थानच्या संघाला २० षटकांमध्ये ९ बाद ९० धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर एव्हिन लुईसने सर्वाधिक २४ धावा केल्या. त्या खालोखाल डेव्हिड मिलरने १५ तर यशस्वी जैस्वाल आणि राहुल तेवातिया या दोघांनी प्रत्येकी १२ धावा केल्या. राजस्थानच्या संघाचा मानहानीकारक पराभव झाला. त्यासोबतच त्यांच्या नावावर एका लाजिरवाण्या पराभवाची नोंद झाली.

मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम
IPL Against RR ट्रेंडिगमागची गंमत; फ्रेंचायझीनही दिलं उत्तर
मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम
इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

राजस्थानच्या संघाने संपूर्ण २० षटकात मिळून ९० धावा केल्या. यंदाच्या हंगामातील एखाद्या संघाची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी हंगामात विराट कोहलीच्या बंगळुरू संघाची कोलकाताविरूद्ध वाईट अवस्था झाली होती. पण त्यावेळी बंगळुरूने सर्वबाद ९२ धावा केल्या होत्या. राजस्थानला मात्र तितक्या धावाही करता आल्या नाहीत. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे राजस्थानच्या संघाकडून केवळ चार फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

मुंबईकडून झाला लाजिरवाणा पराभव; RR च्या नावे नकोसा विक्रम
इशानला फॉर्ममध्ये परतण्यासाठी 'या' तीन क्रिकेटपटूंनी केली मदत

दरम्यान, राजस्थानचा डाव चांगल्या पद्धतीने सुरू झाला होता. पॉवर प्ले पर्यंत त्यांच्या संघाची धावसंख्या १ बाद ४१ होती. त्यानंतर संघाच्या डावाला गळती लागली. यशस्वी जैस्वाल पाचव्या षटकात बाद झाला होता. त्यानंतर एव्हिन लुईस, संजू सॅमसन, शिवम दुबे, ग्लेन फिलिप हे चौघे पटापट माघारी परतले. त्यामुळे राजस्थानच्या डावाची अवस्था १ बाद ४१ वरून ५ बाद ५० अशी झाली होती. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया या दोघांच्यात २१ धावांची भागीदारी झाली. पण त्यांना पुढे फारशी मजल मारता आली नाही. त्यांचा डाव २० षटकांमध्ये ९ बाद ९० धावांवर थांबला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com