IPL Closing Ceremony : ए. आर. रेहमानची 'वंदे मातरम' ने सुरूवात

IPL Closing Ceremony : ए. आर. रेहमानची 'वंदे मातरम' ने सुरूवात

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सांगता समारंभाला रवी शास्त्रींच्या दमदार आवाजाने सुरूवात झाली. त्यानंतर उत्साही रणवीर सिंहने मैदानावर आपल्या नृत्याने सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यानंतर भारताचा दिग्गज संगीत दिग्दर्शन आणि गायक ए. आर. रेहमानच्या वंदे मातरंम गाण्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले. (IPL Closing Ceremony)

IPL Closing Ceremony : ए. आर. रेहमानची 'वंदे मातरम' ने सुरूवात
IPL Final GT vs RR Live : रणवीर सिंहचा गुजराती तडका

ए. आर. रेहमानने यानंतर बॉलीवूडमध्ये गायलेल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याला मोहित चौहान या गायकानेही चांगली साथ दिली. रेहमानने युवामधील गाणी, सड्डा हक्क, रंग दे बसंती, यासारख्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणी गायली.

IPL Closing Ceremony : ए. आर. रेहमानची 'वंदे मातरम' ने सुरूवात
'जॉसने 800 धावा केल्यात? मी असतो तर 1600 केल्या असत्या'

आयपीएलच्या 15 व्या हंगामाची (IPL 2022) सांगता आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. फायनल गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या होत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभ सुरू झाला. तब्बल तीन वर्षानंतर आयपीएलचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला. कोरोना साथरोगामुळे गेली तीन वर्षे अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी होती. मात्र आयपीएल 2022 चा हंगामाचा शेवट धूमधाडाक्यात करण्याचा बीसीसीआयचा मानस होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com