IPL Closing Ceremony चे फोटो व्हायरल, रिहर्सल करताना दिसले स्टार

संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहे
IPL Closing Ceremony
IPL Closing Ceremony

IPL Closing Ceremony: आयपीएल 2022 चा अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सचा यांच्यात खेळल्या जाणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर 29 मे ला अंतिम सामना होणार आहे. सामन्यापूर्वी समारोप समारंभ होणार असल्याने सामना रात्री 8.00 वाजता खेळवला जाणार आहे. आयपीएल 2022 चा समारोप समारंभ सुमारे 45 मिनिटांचा असेल ज्यामध्ये बॉलीवूड स्टार्स त्याचा जलावा दाखवणार आहे.

संगीत दिग्दर्शक एआर रहमान देखील समारोप समारंभात परफॉर्मन्स करणार आहे. याशिवाय बॉलिवूड स्टार रणवीर सिंगही दिसणार आहे. याशिवाय सोहळा झारखंडच्या छाऊ नृत्याचे कलाकारही सादर केली जाणार आहेत. पीएम मोदी देखील आजचा अंतिम सामना पाहण्यासाठी येऊ शकतात.

IPL Closing Ceremony
IPL Controversy: 'या' तीन वादांनी गाजलय आयपीएलचे मैदान

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रहमान संगीताची जादू पसरताणा दिसत आहे. दुसरीकडे इतर कलाकारही त्यांच्या कौशल्याची रिहर्सल करत आहेत. आयपीएल दरम्यान भारतीय क्रिकेटचा प्रवास समोर आणण्यासाठी आमिर खान देखील आपल्या नव्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहे.

IPL Closing Ceremony
मोदी स्टेडियम मध्ये मोदी ? IPL फायनलसाठी गुजरात टायटन्सला करणार सपोर्ट ?

आयपीएलचा अंतिम सामना राजस्थान आणि गुजरात यांच्यात होणार आहे. संपूर्ण हंगामात या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळी दाखवली आहे. आजचा सामना जो कोणता संघ जिंकेल तो हंगामाचा विजेता होईल. 14 वर्षांपूर्वी राजस्थानने आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेतेपद पटकावण्याची अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करू शकणार का हे पाहणे महत्वाचं ठरू शकत. त्याचबरोबर गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्याच सत्रात अंतिम फेरी गाठून अप्रितिम कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com