गल्ली क्रिकेट खेळा IPL सामन्याचे फ्री तिकीट मिळवा! जाणून घ्या स्कीम

TATA IPL 2022
TATA IPL 2022Sakal

आयपीएल स्पर्धा आता चांगलीच रंगात आली आहे. आतापर्यंत झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या लोकप्रिय टीम संघर्ष करताना दिसत आहेत. दुसरीकडे नव्या फ्रेंचायझींनी आपल्यातील धमक दाखवून देत जेतेपद मिळवण्यासाठी दावेदारी भक्कम केलीये. आयपीएलचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी स्पर्धेचे अधिकृत स्पॉन्सर असलेल्या टाटा ग्रुपने चाहत्यांसाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. DeshKaPitch गल्ली क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून चाहत्यांना मोफत तिकीट देण्याचा प्लॅन टाटाने आखलाय. या स्पर्धेत सहभागी होऊन चाहते आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी थेट स्टेडियममध्ये हजेरी लावू शकतात.

नेमकी काय आहे स्कीम

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) किंवा ट्विटरच्या (Twitter) च्या माध्यमातून गल्ली क्रिकेट खेळतानाचे फोटो शेअर करायचे आहेत. फोटो शेअर करताना क्रिकेट चाहत्यांनी #DeshKaPitch असा हॅशटॅग वापरायचा आहे. याशिवाय फोटो शेअर करताना @tatacompanies सह 3 मित्रांना टॅग करायचे आहे.

TATA IPL 2022
हार्दिक पांड्या पुन्हा स्ट्रेचरवर; गुजरातसह टीम इंडियाचीही चिंता वाढली

क्रिकेट चाहते 11 एप्रिलपर्यंत या स्पर्धेत होऊ शकतात सहभागी

DeshKaPitch गल्ली क्रिकेट स्पर्धा टाटा सन्सद्वारा आयोजित करण्यात आलीये. 11 एप्रिल 2022 सकाळी 10.00 वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. 18 वर्षांपेक्षा अधिव वय असणाऱ्यांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांना या स्पर्धेच्या माध्यमातून मोफत तिकीटे मिळवण्याची संधी आहे.

TATA IPL 2022
CSK च्या पराभवानंतर रैनाचा फोटो तर जडेजाचा व्हिडिओ व्हायरल

स्पर्धेत सहभागी झालेल्या चाहत्यांमधून विजेता निवडण्याचे सर्व अधिकार हे टाटा समुहाकडे असतील. आयोजकांचा निर्णय अंतिम मानला जाईल. जे विजेता ठरतील आणि तिकीट मिळवतील त्यांना आपले तिकीट दुसऱ्याला देता येणार नाही. तसेच तिकीटाच्या बदल्यात पैसे दिले जाणार नाहीत, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com