VIDEO : शाहरुख ठरला झिरो; सुहाना खानची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Shah Rukh Khan's daughter Suhana
Shah Rukh Khan's daughter SuhanaSakal

IPL 2022, PBKS vs KKR : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात शाहरुख खानच्या (Bollywood Star Shahrukh Khan) मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मालकीच्या पंजाब किंग्जला (PBKS) पराभवाचा दणका दिला. आयपीएलमधील या दोन संघात एक कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. तामिळनाडूचा युवा फलंदाज शाहरुख खानला आपल्या ताफ्यातून खेवण्यासाठी प्रिती झिंटानं लिलावात जीवाच रानं केल्याचे पाहायला मिळाले होते. याची खूप चर्चाही रंगली होती. शाहरुख खानमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची ताकद आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपली क्षमता दाखवून दिलीये. सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी 2021 च्या अंतिम सामन्यात तमिळनाडूच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला होता. शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार खेचून त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.

Shah Rukh Khan's daughter Suhana
VIDEO : 'सुहाना' सफर और ये मोसम 'हसीन'| PBKS vs KKR

पण पंजाब किंग्जचा फलंदाज शाहरूख खान (Shahrukh Khan cricketer Punjab Kings) कोलकाता विरुद्ध आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देण्यात अपयशी ठरला. ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या सुहाना खानची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरुख खान आउट झाल्यावर सुहाना खान (Shah Rukh Khan's daughter Suhana) आनंदाने उड्या मारताना दिसली. सेलिब्रेशनचा तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाबचा संघ अडचणीत असताना शाहरुखवर सर्वांच्या नजरा होत्या. पण त्याला खातेही उघडता आले नाही.

Shah Rukh Khan's daughter Suhana
IPL 2022 : 'मसल पॉवर' रसेलचा 200 + स्ट्राइक रेटचा रेकॉर्ड

टिम साउदीच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. पंजाब किंग्जच्या डावातील 13 व्या षटकात शाहरुख खाने हवेत चेंडू मारला. कोलकाताचा खेळाडू नीतिश राणा याने कोणतीही चूक न करता कॅच पकडला आणि शाहरुख खानला तंबूचा रस्ता धरावा लागला. शाहरुख जेव्हापासून आयपीएलमध्ये खेळतोय तेव्हापासून त्याचे नाव बॉलिवूड स्टार शाहरुख खानशी जोडले जात आहे. त्यामुळेच या सामन्यावेळी तो बाद झाल्यानंतर खान फॅमिलीची रिअ‍ॅक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलका आर्यन (Aryan khan), अबराम आणि मुलगी सुहाना खानसह अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) स्टेडियमवर कोलकाता संघाला प्रोत्साहन देताना दिसले. त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com