IPL 2022 Today Match| कोलकत्यासाठी अस्तित्वाची लढाई आज लखनौविरुद्ध रंगणार लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 today match LSG VS KKR Lucknow Super Giants and Kolkata Knight Riders

कोलकत्यासाठी अस्तित्वाची लढाई आज लखनौविरुद्ध रंगणार लढत

पुणे : श्रेयस अय्यरच्या कोलकता नाईट रायडर्ससाठी यंदाच्या आयपीएल मोसमात आज अस्तित्वाची लढाई असणार आहे. आतापर्यंत १० सामन्यांमधून फक्त चारच लढतींत विजय संपादन करणाऱ्या या संघासमोर आज प्ले ऑफच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या लखनौ सुपरजायंटस्‌ संघाचे आव्हान असणार आहे. कोलकता नाईट रायडर्ससाठी आजची लढत जिंकू किंवा मरू अशाच धाटणीतील असेल. लखनौ सुपरजायंटस्‌ संघ मात्र या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. (IPL 2022 Today Match LSG VS KKR)

हेही वाचा: MI vs GT : मुंबईने गुजरातला अखेरच्या चेंडूवर पाजले पाणी - Highlights

सलग पाच लढतींत पराभूत झालेल्या कोलकता संघाने मागील लढतीत राजस्थानला हरवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. या लढतीत व्यंकटेश अय्यर व वरुण चक्रवर्ती या दोघांनाही वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिंकू सिंग व अनुकूल रॉय या दोघांना व्यंकटेश व वरुण यांच्याऐवजी संघात घेण्यात आले. दोघांनीही समाधानकारक कामगिरी केली. त्यामुळे या दोघांचे उद्याच्या लढतीतील स्थानही नक्की असणार आहे.

कोलकता संघाची फलंदाजीची जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यर (३२४ धावा), नितीश राणा (२४८ धावा) व आंद्रे रसेल (२२७ धावा) या तिघांच्या खांद्यावर पुन्हा एकदा असणार आहे. तसेच गोलंदाजी विभागात उमेश यादव (१५ बळी), टीम साऊथी (१० बळी), आंद्रे रसेल (१० बळी), सुनील नारायण (७ बळी) यांना लखनौच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे.ो

राहुल नावाची रनमशीन

लखनौच्या संघात एक रनमशीन आहे. कर्णधार के. एल. राहुल हे त्या रनमशीनचे नाव. त्याने या मोसमात आतापर्यंत २ शतक व २ अर्धशतकांसह ४५१ धावांचा पाऊस पाडला आहे. कोलकताचा संघ राहुलला रोखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करील. क्वींटोन डी कॉक (२९४ धावा), दीपक हुडा (२७९ धावा) यांनीही फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. पण अयुष बदोनी (१३८ धावा), कृणाल पंड्या (१२८ धावा), मार्कस स्टोयनीस (९० धावा), मनीष पांडे (८८ धावा) यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. लखनौच्या दमदार कामगिरीत या खेळाडूंचे सातत्यपूर्ण कामगिरीतील अपयश झाकोळले गेले आहे.

हेही वाचा: खेळाडूंना उसंत नाही! भारताचा विंडीज दौरा झाला फिक्स, अमेरिकेतही सामने?

गोलंदाजांकडून अपेक्षा

लखनौच्या गोलंदाजांनी आतापर्यंत या स्पर्धेत छान कामगिरी केली आहे. अवेश खान (११ बळी), कृणाल पंड्या (९ बळी), जेसन होल्डर (९ बळी), मोहसीन खान (८ बळी), रवी बिश्‍नोई (८ बळी), दुशमंता चमीरा (८ बळी) यांनी प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचे काम इमानेइतबारे केले आहे. तसेच महत्त्वाच्या क्षणी बळीही टिपले आहेत. अवेशला मागील लढतीत संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याऐवजी संघामध्ये के. गौतमला स्थान देण्यात आले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्यामुळे ऑफस्पिनर गौतमची निवड करण्यात आली होती.

Web Title: Ipl 2022 Today Match Lsg Vs Kkr Lucknow Super Giants And Kolkata Knight Riders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top