IPL 2024 CSK vs SRH
IPL 2024 CSK vs SRH sakal

IPL 2024 CSK vs SRH : हैदराबादमध्ये आज पुन्हा धावांचा पाऊस? ; चेन्नईचा हैदराबादशी सामना

हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत ५२३ धावांचा पाऊस पडला. यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने एका डावातील सर्वाधिक २७७ धावांची रतीब उभारला.

हैदराबाद : हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच लढतीत ५२३ धावांचा पाऊस पडला. यजमान सनरायझर्स हैदराबाद संघाने एका डावातील सर्वाधिक २७७ धावांची रतीब उभारला. मुंबईनेही तोडीसतोड फलंदाजी करीत २४६ धावांचा धमाका केला. आता उद्या याच स्टेडियममध्ये हैदराबाद- चेन्नईमध्ये लढत रंगणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धावांचे एव्हरेस्ट तयार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही संघांना मागील लढतीत हार पत्करावी लागल्यामुळे विजयी पुनरागमनासाठी हे संघ मैदानात उतरतील.

गतविजेत्या चेन्नईने पहिल्या दोन लढतींत बंगळूर व गुजरातला पराभूत करीत आश्‍वासक सुरुवात केली. मात्र, मागील लढतीत दिल्लीकडून त्यांना हार पत्करावी लागली. आता या लढतीला मागे टाकण्यासाठी चेन्नईचा संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करील. विशाखापट्टणममध्ये झालेल्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, आयपीएल ही टी-२० स्पर्धा दोन महिने चालते.

IPL 2024 CSK vs SRH
IPL 2024 GT vs PBKS : शशांक सिंगचे झुंजार अर्धशतक, पंजाबने गुजरातचा विजयी घास हिरावला

त्यामुळे संघाच्या कामगिरीत वर-खालीपणा येतो. एखाद्या लढतीत पराभव होऊ शकतो. दरम्यान, ऋतुराजसह राचिन रवींद्र या चेन्नईच्या सलामी जोडीला स्वींग होणाऱ्या चेंडूंचा सामना करायला हवा. दिल्लीविरुद्धच्या लढतीत त्यांची कमकुवत बाजू समोर आली. महेंद्रसिंग धोनीने दिल्लीविरुद्धच्या लढतीत १६ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने आठव्या नव्हे तर वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी, असा सूर उमटू लागला. मात्र, शिवम दुबे व समीर रिझवी या दोघांनाच तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवणार हे निश्‍चित आहे.

आमने - सामने

  • एकूण सामने १९

  • चेन्नई विजय १४

  • हैदराबाद विजय ५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com