IPL 2024 Points Table: दिल्लीने लखनौवरील विजयाने सोडलं शेवटचं स्थान, चेन्नईलाही फायदा; बेंगळुरूचं मात्र मोठं नुकसान

IPL 2024, LSG vs DC: आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवल्याने पॉइंट्स टेबलमध्येही मोठे बदल झाल्याचे दिसून आले.
IPL 2024 Points Table | LSG vs DC
IPL 2024 Points Table | LSG vs DCSakal

IPL 2024 Points Table: शुक्रवारी (12 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत झालेल्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीने मिळवलेल्या या विजयामुळे पाँइंट्सटेबलमध्ये मात्र मोठा बदल झालेला दिसून आला.

दिल्लीने सोडले शेवटचे स्थान

दिल्लीचा हा या स्पर्धेतील ६ सामन्यांतील दुसरा विजय आहे. त्यामुळे आता दिल्लीने चार गुण झाले आहेत. त्याचमुळे दिल्ली गुणतालिकेतील 10 व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावरून आता 9 व्या क्रमांकावर आले आहेत. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला मात्र नुकसान झाले असून ते सर्वात शेवटच्या क्रमांकावर घसरले आहेत.

IPL 2024 Points Table | LSG vs DC
LSG vs DC : शेवटी कुलदीपच उभा राहिला! दिल्लीनं डिफेंडर लखनौचा डिफेन्स भेदला

बेंगळुरूने आत्तापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे केवळ 2 गुण आहेत. आता गुणतालिकेत 4 गुण दिल्ली व्यक्तिरिक्त मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांचेही आहेत. परंतु, या दोन्ही संघांचे 5 सामने झाले असून नेट रन रेटच्या फरकामुळे मुंबई सातव्या आणि पंजाब आठव्या क्रमांकावर आहे.

याशिवाय लखनौला पराभूत व्हावे लागले असले, तरी त्यांनी पहिल्या चारमधील आपले स्थान टिकवले आहेत. परंतु, ते नेट रन रेट कमी झाल्याने तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. लखनौचे 5 सामन्यांतील 3 विजयांमुळे सध्या 6 गुण आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचेही 5 सामन्यांतील 3 विजयांमुळे 6 गुण आहेत. परंतु, त्यांचा नेट रन रेट लखनौपेक्षा चांगला असल्याने त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे.

IPL 2024 Points Table | LSG vs DC
LSG vs DC, IPL 2024: ऋषभ पंतचे ब्रेनफेड की अंपायरचा गैरसमज? दिल्ली-लखनौ सामन्यात DRS इशाऱ्यामुळे वाद

याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सनेही 4 सामन्यांतील 3 सामन्यांत विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचेही 6 गुण आहेत. पण कोलकाताचे नेट रन रेट चेन्नईपेक्षाही चांगला असल्याने त्यांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.

तसेच सनरायझर्स हैदराबादचेही 5 पैकी 3 सामन्यांतील विजयामुळे 6 गुण आहेत, तर गुजरात टायटन्सचेही 6 सामन्यांपैकी 3 विजयांमुळे 6 गुण आहेत. परंतु, नेट रन रेटच्या फरकामुळे हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आणि गुजरात सहाव्या क्रमांकावर आहेत.

पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स असून त्यांनी 5 सामन्यांपैकी 4 सामन्यांत विजय मिळवले असून त्यांचे 8 गुण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com