Pahalgam Attack नंतर सुरक्षेसाठी उचलण्यात आलं मोठं पाऊल; आयपीएलसाठी स्टेडियममध्ये तैनात केली नवी सिस्टीम

Heightened IPL 2025 Security: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. याचदरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीही सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
IPL
IPLSakal
Updated on

२२ एप्रिल रोजी संपूर्ण भारताला धक्का बसला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण पर्यटक होते. त्यामुळे भारतात हळहळ आणि संतापाची वाट उसळली. देशभरात याचे पडसाद उमटले असून सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

याचदरम्यान भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यानही सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व स्टेडियमच्या आसपासचे हवाई क्षेत्र सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने अँटी ड्रोन सिस्टीम 'वज्र सुपर शॉट' सुरू केली आहे.

IPL
Pahalgam Attack : ८ लाखांची फौज, तरी काश्मीरमध्ये हे घडलं? शाहिद आफ्रिदीने मर्यादा ओलांडली, भारतीय सैन्याला बेकार ठरवलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com