
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. रविवारी (२३ मार्च) होत असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात चेन्नईसाठी नूर अहमद आणि खलील अहमद चमकले. त्यातही ४३ वर्षीय एमएस धोनीच्या वेगवान स्टम्पिंगने सर्वांचेच लक्ष वेधले.