
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १८ वा हंगाम असून त्यासाठी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनाच प्रतिक्षा असणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) खेळवला जाणार आहे. दरम्यान, आता बऱ्याच ठिकाणच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सकडूनही मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठीच्या तिकीट विक्रीबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे.