
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी डबल हेडर खेळवले जात असून दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन तगड्या संघात होणार आहे. आयपीएलमधील एल क्लासिको समजल्या जाणारा हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे होणार आहे.
या सामन्याने दोन्ही संघ १८ व्या हंगामातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.