
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२५ मे) दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
हा सामना चेन्नई सुपर किंग्सला हंगामातील शेवटचा सामना आहे. त्यांना यंदा प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आले आहे. त्यामुळे चेन्नईला शेवट गोड करण्याची इच्छा असेल. तसेच गुजरातसाठीही प्लेऑफपूर्वीचा अखेरचा सामना आहे. त्यामुळे त्यांचा हा सामना जिंकून पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर कायम राहण्याचा प्रयत्न असेल.