
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला गेल्या १३ वर्षांची पहिल्या सामन्यातील पराभवाची परंपरा बदलता आली नव्हती. आता त्यांना शनिवारी सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
शनिवारी मुंबई इंडियन्सचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध झाला. या सामन्यात गुजरातने मुंबईला ३६ धावांनी पराभवाचा धक्का दिला. गुजरातचा हा या हंगामातील पहिलाच विजय आहे. त्यांनाही पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.