
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघात मंगळवारी (६ मे) सामना होत आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. दरम्यान, पहिल्या डावात गुजरात गोलंदाजी करत असल्याने त्यांचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा नेहमीप्रमाणे डगआऊटजवळ सक्रिय दिसला.