
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५६ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळवला जाणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणार असलेला हा सामना दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदारी ठोकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवेल.