
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सोमवारी (२१ एप्रिल) सामना खेळवला जात आहे. या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून कोलकाताला चांगलाच संघर्ष करायला लावला.
या सामन्यात कोलकाताच्या क्षेत्ररक्षकांकडूनही मोठ्या चुका झाल्याचे दिसले. तरी कोलकाताने गुजरातला २०० धावांच्या आत रोखण्यात यश मिळवले. गुजरातने कोलकातासमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.